दहावी बारावीनंतर काय पालक आणि विद्यार्थी दोहोंसाठी ?

दहावी बारावीनंतर काय  पालक आणि विद्यार्थी दोहोंसाठी ?




दहावी बारावी नंतर काय ह्या विचारात पडलात मग रोहनची स्टोरी नक्की वाचा .

रोहन हा एक पोलिसांचं पोर !

आता पोलिसांचं पोर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच एका करप्ट पोलीस हवालदाराचा चेहरा उभा राहतो हे दुर्दैवच म्हणावं लागेल .

अस आपण पोलिसांना किंबहुना कोणालाही जज कारण बरोबर नाही .

परंतु आपण बहुतांश मध्यमवर्गीय यापलीकडे पोलिसांकडे पाहत नाही .
 
    गोष्ट अशी आहे की रोहनचे वडील म्हणजे आमचे म्हात्रे  काका म्हात्रे अत्यंत शिस्तप्रिय आणि ईमानदार माणूस . त्यांनी कधीच आपल्या आयुष्यात लाच वगैरे घेतलेली नाही .

किंवा फुकट कधी कोणाकडे वस्तु ,सेवा मागताही नसत .
नाहीतर आपले कोणी नातेवाईक पोलीस असतील तर आपण पाहिले असेलच कसे केबल वाल्यापासून ते दुधवाल्यापर्यंत सगळेच कसे ,

"राहुद्याना साहेब !"

"आता आम्हाला लाजवताय काय साहेब !"

अशाप्रकारे उगाचच लोकच अधिकार्याना फुकटे बनवतात .

रोहन हा नाइन्टीज मध्ये मुंबईत वाढलेला मुलगा तोही पोलीस लाईनीत !

आता रोहन ने त्याच्या बालपणापासून त्याच्या मित्रांकडे काही चैनीच्या गोष्टी जसे की गळ्यातील सोन्याची चेन ,बुडाखाली स्पोर्ट बाईक आणि खिशात महागडे मोबाईल तेही १७-१८ वर्षाच्या वयात रोहनला पाहत आलेला होता .

एका पोलीस हवालदाराला न परवडणाऱ्या या गोष्टी रोहनला कधीही न मिळाल्यामुळे रोहन कधी कधी आतून दुखावला जायचा .

रोहनला आपल्या वडिलांचा स्वभाव चांगलाच माहीत होता ,तो त्यांना चांगलाच ओळखायचा .
त्यामुळे म्हात्रे काकांकडे असला काही हट्ट करण्याची त्याची हिंमतच व्हायची नाही .

जेव्हा रोहन १५-१६ वर्षांचा झाला तेव्हा ह्या गोष्टींचा राग यायला लागला की माझया मित्रांकडे ज्या गोष्टी आहेत त्याला माझ्याकड़े का नाहीत ?

म्हात्रे काका आणि काकी दोघेही अगदी साधी सरळ माणस त्यांनी कधीच रोहनला त्यांच्या मित्रांच्या वडिलांच्या कमाईबाबत काहीही वाईट साईट सांगितले नाही .

कारण एकच की शेजार संबंध खराब होऊ नयेत !

    आता म्हात्रे काकांचा स्वभाव मुळातच क्रान्तिकारी परंतु म्हणतात ना संसार आयुष्यात बऱ्याच तडजोडी करायाला भाग पाडतो .

असेच काहीसे म्हात्रे  काकांच्या बाबतीतही झाले.
म्हात्रे  काकांनी स्वतःहून कधीच भ्रश्टाचार केला नाही परंतु त्यांनी तो होत असताना कधी थांबविण्याचा प्रयत्नही केला नाही .
सुरावतीच्या काळात केला ही असेल पण त्यांनाही कळून चुकलं होत नक्की या स्वार्थी जगात नक्की कोणासाठी आपण क्रांती करतोय आणि त्यांनी कुटुंबाकडे पाहून एक पाऊल मागेच घेतले .

अलिबागेत वाढलेले म्हात्रे काका इतके साधे होते की त्यांच्यासाठी घराचा भात ,भाकरी आणि जिताडा हेच काय ते स्वर्ग !


परंतु आपण म्हणतो ना संस्कार रादर प्रभाव हा प्रत्येक व्यक्तीचा हा होत असतो आता तो चांगला आणि वाईट असा दोन्ही प्रकारे होतो .

आणि सध्याच्या डिजिटल युगात इंटरनेट ७०% पॉर्न आणि सेक्स या गोष्टीनी भरलेले असताना आपण समजू शकतो Distraction टाळणे किती कठीण गोष्ट आहे .

आणि कोणतीही गोष्ट Distraction आहे तोपर्यंत ठीक आहे परंतु हीच distraction बऱ्याच  जणांच्या बाबतीत addiction बनते ही खूप धोकादायक आहे .

आणि हे टाळण्यासाठी किंवा मुलांना सावरण्यासाठी पॉझिटिव्ह वातावरण घरात निर्माण करणे ही पालकांची जबाबदारी आहे .

मुलांना समजावून सांगण्याची पद्धत पालकांना अवगत करण्याची नितांत आवश्यकता आहे .

मध्यमवर्गीय पालक बऱ्याचदा इथेच चुकतात .

कम्युनिकेशन गॅप मुळे विसंवाद ,प्रॉब्लेम्स वाढतात  आणि पर्यायाने प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत .
आणि मग अशाच प्रशांच्या उत्तरांच्या शोधात मग मुले भरकटतात .

आई वडील जर कमी शिक्षित अथवा कमी समजूतदार असतील तर मुलांनी समजूतदारपणाची जबाबदारी स्वतःवर घ्यायला हवी .

आयुष्यात कितीही मोठी समस्या आली तरी खोटे बोलू नये त्यामुळे पुढे जाऊन आपल्यालाच त्रास होत्तो .

आयुष्यातील महत्वाच्या गोष्टींबाबत घरा घरात चर्चा होत नसल्याने मग मुलांना प्रत्येक  कटु अनुभव हा त्याची किंमत चुकवुनच घ्यावा लागतो हीच जर दोन्ही पिढयांमध्ये चर्चा झाली तर बर्याचश्या गोष्टी सुकर होऊ शकतात .

   हीच गोष्ट रोहनच्या बाबतीत झाली रोहन त्याच्याकडे काही गोष्टी ज्या त्याच्या मित्रांकडे आहेत त्या नसल्यामुळे न्यूनगंड निर्माण झाला.

आणि वडिलांशी बोलूच शकत नसल्याने आणि मित्राना सांगावे तर पाठमोरी ते आपली टिंगल तर करणार नाही ना ?

या भीतीने तो आतल्या आत घुसमटत राहिला आणि डिप्रेशन मध्ये गेला .
त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स त्याने स्वतःहुनच विनाकारण गमावला .

आता ह्याला आणखी काही गोष्टीही कारण आहेत पण त्यांना आपण जबाबदार ठरविले तर आपण क्रियाशून्य आहोत हे सिद्ध होते .

जसे की सिनेमा टेलिव्हिजन या यामध्ये प्रेरणादायी कहाणी किंवा सिनिमे किती दाखविले जातात ?

सगळा भरणा फेक हिरोइझम आणि अर्थहीन प्रेमकथा .

बर घरी आई अशिक्षित आणि बाबानां कामातून वेळ नाही .

अशात रोहन एकटा पडला ...

आणि तो स्वतःला कोसू लागला .त्यात त्याचे सगळे बालपण शकलाका बुमबुम सोनपरी आणि शक्तिमान पाहण्यात गेलेले त्यामुळे त्याच्या चिकित्सक पणाची आपण कल्पनाच केलेली बरी .

इथल्या टेलिव्हिजनने कधी स्वतःच्या हिमतीवर कसे मोठे होऊ शकतो असे काही प्रोग्राम्स दाखविलेच नाही .
जे काही दाखविले ते सासू सुनांची न होणारी भांडण  ,गरीब मुलगा आणि श्रीमंत मुलगी अशी अशक्य प्रेमकहाणी .
आणि सिगारेट आणि दारू पिऊन मुलींना छेडणारा हिरो .

अशा सगळ्या वातावरणात रोहन मोठा होत्तो .

तो कसा बसा ग्रॅज्युएशनही करतो .

परंतु हाय न्यूनगंड तो नेहमी सोबत घेऊनच असतो की माझयाकडे काय नाहीये परंतु तो हा विचार करत नाही त्याला मुंबईसारख्या मोठ्या शहरात शिकण्याची संधी मिळाली आणि त्याचाच गावी अनेक मुली अशी आहेत ज्यांना परिस्थितीमुळे अर्धवट शाळा सोडावी लागली .
अनेक जण जेव्हा मजुरी करतात तेव्हाच  त्यांना शाळेत जाता येते .
शेतात काम करायला लागते म्हणून अनेकांना अभ्यासाला वेळ देता येत नाही .

त्यामुळे आपलाच प्रॉब्लेम जगात मोठा आहे असा न्यूनगंड घेऊन जगत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे काही आहे त्याचा जास्तीत जास्त चांगला वापर कसा करता येईल यावर भर दिला पाहिजे.

वाचनाची आवड नसल्याने रोहनला कोणतेही सामाजिक भान किंवा राजकीय ज्ञान नव्हते.

जे काही अर्धवट ज्ञान होते तेही केवळ एकीव.

अभ्यासातही ठीक ठाकच असल्याने टॉपर वगैरेचा प्रश्नच नव्हता .
तशी कोणती प्रेरणा त्याच्या डोळ्यासमोर नव्हतीच आयुष्यात नक्की कोणाला तरी प्रेरणा बनवा आणि झोकून द्या स्वतःला त्याच्यासारखे बनण्यासाठी .

रोहनने कॉमर्स मधून पदवी घेतली परंतु का घेतली ह्याचेही उत्तर त्याचायकडे नव्हते.

एक उत्तर तो देऊ शकत होता ते म्हणजे त्याला ५५% टक्के होते त्यांच्या काळात एक फिक्स होत फर्स्ट क्लास वाले सायन्स घेणार सेकंड क्लास वाले कॉमर्स आणि बॅँकेचे आर्ट्स .
त्यामुळे हा पठ्ट्या कॉमर्स ग्रॅज्युएट झाला .

पण आता पुढं काय घोर अंधार कारण कोणतेही करियर प्लानिंग नाही कोनातीही कला अवगत नाही .

अशात पठ्ठ्याने एक काम बरोबर केले होते ते म्हणजे युट्युब वर व्हिडीओ पाहण्याचा नाद लागला होता त्याला आणि कुठूनतरी त्याला शोध लागला की युट्युबर व्हिडीओ अपलोड केले की पैसे मिळतात म्हणून मज्जा म्हणून तो कॉमेडी व्हिडीओज स्वतःच बनवू लागला आणि अपलोड करू लागला आणि त्याला ह्या काळात इंटरेस्ट निर्माण झाला.

आणि तो दररोज  नवेळ वनव्या गोष्टी शिकू लागला आणि त्या आपल्या व्हिडीओज मध्ये इम्प्लिमेंट करू लागला .

रात्रंदिवस तो तेच करायचा ह्याने त्याची प्रोडूक्टिव्हिटी भयंकर वाढली आणि तो पॉप्युलर ही व्हायला लागला

आणि मग १ मिलियन स्बस्क्रायबर ते बॉलिवूड डायलॉग रायटर अशी त्याची जर्नी आता सगळ्यांनाच मनमोहक वाटते परंतु हा तोच रोहन आहे जो कधी काळी डिप्रेसशन चा शिकार होता .

त्यामुळे मित्रानो फक्त एक इंटरेस्ट निर्माण करण्याची आवश्यकता आहे बाकी सगळं वेळ बरोबर निभावून नेते .

पास आणि नापास झालेल्या सगळ्यांना बरोबर संधी आहे .

रादर नापास झालेल्यांकडे एक बर्निंग डिझायर असली पाहिजे काहीतरी करून दाखविण्याची .

रोहन जर करू शकतो तर तुमच्यातील  प्रत्येकजण करू शकतो .

तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या भावी जीवनासाठी आमच्या रोहनकडून आणि माझ्याकडून खूप खूप (खंडीभर ) शुभेच्छा .



धन्यवाद !



आमच्या  माय प्रेरणा या संकेतस्थळाला जरूर भेट द्या इथे तुम्हाला विविध क्षेत्रातील उत्तुंग व्यकिमत्वांच्या तसेच त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा अनुभव घेता येईल










Post a Comment

0 Comments