अर्धवट शाळा सोडलेला कोकणातील बबलु

अर्धवट शाळा सोडलेला कोकणातील बबलु 




तर बबलुचा जन्म हा रत्नागिरी जिल्हातील एका छोट्याश्या खेडेगावी झाला . 
बबलूचे गाव हे अतिशय सुंदर समुद्रकिनारी वसलेले टुमदार १५-२० घर असलेले एक टिपिकल तळ कोकणातिल गाव. 

बबलूचे वडील हे शेतकरी होते त्यांची परंपरागत वाटे वाटे होत होत बबलूच्या वडिलाच्या म्हणजे दामा काकाच्या वाट्याला अर्धा एकराची दांडी आली होती . 


ही अर्धा एकराची दांडी आणि दर्यामधील सोन म्हणजे मासली (तुम्ही मुंबई पुणेकर मासोळी म्हणत असाल)
हेच त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन . 

अरे हो तुम्हाला बबलूच पूर्ण नाव सांगायचंच राहील ,

प्रणय दामोदर भुवड हे आहे बबलूच पूर्ण नाव . 

तुम्हाला एक गंमत माहिती आहे का बबलूचे वडीलनॉन मॅट्रिक आणि आई मॅट्रिक पास आहे . 

शिवाय बबलूची आई शिवणकामही करीत असे. 

या दोघांमध्ये कधी तू तू मैं मै झाली की बबलूची आई आपलं मॅट्रिक पास च हत्यार बाहेर काढून दामा काकाला गप्पा करत असे . 

बबलू हे टोपण नाव बबलूच्या डोकरीने (आज्जी ) बबलूला ठेवले होते त्यामळे बबलूला अख्खा गाव बबलू म्हूणनच हाक मारायचा . 

परंतु बबलूच्या आईला फारस बबलू म्हटलेलं आवडत नसे ती त्याला प्रणय म्हणूनंच हाक मारी . 

बबलूला वडिलांसोबत शेतीची कामे करण्याची अगदी लहानपणापासून फार हौस . 

शेतातील खंडी भरण्यापासून ते बेणणी कापणी झोडपाणी सगळीच कामे बबलू त्याच्या परीने हौशीने करायचा .

परंतु अभ्यासात काही बबलूचे मन रमायचे नाही . 
आणिह्याच गोष्टीचे टेन्शन त्याच्या आईला यायचे कारण बबलूच्या आईच्या माहेरचे सगळे सुशिक्षित त्यात तिचा भाऊ रमेश शिंदे हा तालुक्यातील राष्ट्रीय पुरस्कार विजेता शिक्षक . 

आणि बबलूचे वडील तितकेसे शिक्षणाबाबतीत जागरूक नव्हते किंबहुना त्यांनी कधी त्यांचे खेडेगाव सोडून त्याबाहेरील जीवन  अनुभविलेलेच नव्हते . 

त्यांच्यासाठी करिअर महत्वाकांक्षा असले शब्द कानावरही पडलेले नव्हते परंतु बबलूची आई मात्र माहेरच्या वातावरणामुळे बरीचशी जागरूक होती . 

शिक्षणाविषयी एवढ्या लहानपणीच आवड नासाने ही नक्कीच चांगली गोष्ट नाही हे त्याच्या आईने कळून चुकले होते . 

परंतु तिनेही कधी शिक्षणाविषयी का आवड नाहीये याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही . 

त्याउलट त्याला दम देऊन मारून त्याला अभ्यास करायला त्याची भाग पाडत असे.त्यामुळे अजूनच तो शाळा अभ्यास या गोष्टींपासून दूर जाऊ लागला . 

इयत्ता पाचवीलाच त्याने शाळेत जाणे सोडून दिले ,बार त्याच्या आईने खूप प्रयत्न केले परंतु त्याचे वडील नेहमी म्हणायचे ,

"त्याला इच्छाच नाही तर आपण जबरदस्ती करून तो शिकणार आहे का ?"

आणि आपला मुलगा शाळा सोडून बसलाय याचे त्याच्या वडिलांना ही फारसे काही सोयर सुतक नव्हते . 
आपला मुलगा आपल्यापेक्षाही कमी शिकला तर तर त्याच्या भविष्याचे काय ?
असा प्रश्न कदाचित त्यांच्या समोर येत नसावा कारण गावात राहून आलेली ती  अलपसंतुष्ट मानसिकता . 

"काही नाही झालं तरी शेती करून खाईल !"

ते म्हणतात ना नुसते जास्त पावसाळे बघून अनुभव येत नाही . 
खरे अनुभव वेगवेगळ्या लोकांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी राहिल्यानेच मिळतात . 

चौथी पाचवीत असतानाच बबलूला काही वाईट मुलांची संगत लागली होती आणि तेच त्याच्या अभ्यासामध्ये रस नसल्याचे एक कारण असावे बहुतेक . 

या संगतीमुळे त्याला वयाच्या १०-११ वर्षीच तंबाखू आणि सिगारेट चा नाद लागला होता . 

आणि म्हणूनच त्याने ह्या सांगतेमुळे शाळा सोडली . 

  कधी कधी शाळेतील शिक्षकांचा दृष्टिकोनही इतका संकुचित असतो की ,ते फक्त हुशार मुलांना पुढे बसवितात आणि जो अभ्यासात मागे आहे त्याला मागे बसवितात . 
हे म्हणजे असे झाले जो आजारी आहे त्याकडे दुर्लक्ष करणे आणि जो सुदृढ आहे त्याला अजून संधी देणे . 

खर तर कोणाताही मुलगा अभ्यासात मागे पडत असेल तर ती त्या शिक्षकाची जबाबदारी असायला हवी . 

परंतु असा विचार कोणी करतांनाच दिसत नाही . 

एकदा कोल्हापूर संस्थानात शाहू महाराजानी गणित या विषयासाठी एका शिक्षकाची नेमणूक केली . 

आठवडाभरातच त्या शिक्षकाने शाहू महाराजांकडे विद्यार्थ्यांची तक्रार केली की महाराज ही मुले नालायक आहेत आणि ह्यांना काहीही येत नाही . 

शाहू महाराज त्या शिक्षकांना विचारतात ,

"काहो गुरुजी ते नालायक आहेत हे ठीक आहे ,
परंतु त्यांना लायक बनविण्याची जबाबदारी तुमच्यावर सोपविली आहे .

त्याचाच पगार आम्ही तुम्हाला देतो.   

आणि ती जबाबदारी तुम्हाला पूर्ण नसेल करता येत तर तुम्ही कोण ?"

त्या शिक्षकाला त्याची चूक लगेच कळाली आणि ते शाहू राजांकडे काही कालावधी मागून परिस्थितीत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले . 

आता जो शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे तो विषय वेगळा आणि त्याचेच शिकार बबलू सारखे कित्येक लहान लहान मुले होतात . 

 बबलू ची आई खूपच खिन्न झाली होती परंतु ती असहाय्य होती माहेरची मदत मागावे तर नवऱ्याचा इगो आडवा येत होता . 

आणि इकडे बबलू व्यसनाधीनतेमध्ये गुंग होत चालला होता . 

त्याचा दिनक्रमाचा ठरला होता दिवसभर गावात उनाडायचं आणि चार टवाळ टाळक्यांसोबत सिगारेट ओढायला जायचं . 
सिगाराइट ओढत असताना आपण कोणातरी मंत्र्याची अवलाद आहोत की काय असाच त्यांचा अविर्भाव असे . 

आणि ह्या वाईट संगतीमुळे तो अजूनच वाईट गोष्टी करू लागला लहान वययताच तो पॉर्न पाहू लागला आणि कधीतरी एकदा फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी तो दारू ही ट्राय करून मोकळा झाला होता . 

हे सगळं वयाच्या ११ व्या वर्षी आणि एवढी ग्रोथ एका वर्षात जे बहुतांश शहरातले कॉलेज तरुण इयर ड्रॉप लागल्यावर करतात ते सगळं हा पठ्ठ्या पाचवीच्या स्कूल ड्रॉप मध्ये करत होता . 

हे सगळ अर्थातच लपून छपून करत असल्याने आणि वय १०-११ च असल्याने कोणाला कधी संशयही कधी आला नाही त्याच्यावर . 

परंतु एकदा त्याच्या रमेश मामाने एकदा त्याला तालुक्याच्या गावी मोटार सायकल वर २१-२२ वर्षाच्या वात्रट पोरांबरोबर पाहिले . 

आणि ह्या पोरांचा रेकॉर्ड शहरात किती खराब आहे हे त्याला पक्क ठाऊक होत . 

लगेच रमेश मामाने बबलूचे घर गाठले आणि बबलूच्या आईला सगळी कहाणी सांगितली . 

"बाय अग आपला बबलू कोणत्या पोरांबरोबर फिरतो ,
आणि आम्हाला कळलंय तो व्यसन ही करायला लागलाय. 
तुमचं दोघा आई बापाचं लक्ष आहे की नाही पोरावर ?
आणि शाळा सोडल्याचे आम्हाला का नाही सांगितले ?"
बबलूच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली तिला विश्वासच बसेना आपलं पोरग असल्या संगतीत राहत असेल पण ती  तशी मनाची धीट असल्याने तिला तिच्या प्रणयच्या विक्षिप्त वागण्याची आणि स्वभावातील बदलाची लिंक लागली होती . 

मग बबलूच्या आईने बबलूला विचारले काय रे 

प्रणय  काय चाललंय तुझं सध्या ?

बबलू म्हणाला 

"काही नाही आई कुठे काय ?"

बबलूची आई :

काही सांगू नकोस रमेश मामाने सांगितलं मला सगळंतुला पाहिलंय त्याने तालुक्याच्या गावाला कोणत्या टुकार पोरांसोबत फिरतोस ते . 


हे एकताच बबलूच्या कपाळावर घाम येऊ लागला त्याचे हात थर थरु लागले . 

आईने लगेच ओळखले आणि एक भन्नाकन कानाखाली आवाज काढला . 
गोरापान बबलू लालबूंद झाला . 

आणि तो रडत रडत सगळं आईला सांगू लागला आणि पुन्हा असं करणार नाही म्हणू लागला आणि आईची पाया पडून माफी मागू लागला . 

माउलीचच काळीज ते पटकन पिघळलं आणि तिन बबलूला काळजाशी लावल. 

आणि आता ती  त्याला समाजवु लागली . 

"हे बघ बाळा प्रणय मला आणि तुझ्या बाबांना रमेश मामाने समाजावलंय
 आणि तो तुला इथून घेऊन जाणार आहे आणि हेच तुझया भल्याच आहे . "

बबलूनेही आईच एकल आणि तो मामाच्या गावी गेला . 
थोडक्यात बबलू वयाच्या ११ च्य वर्षी कंफर्ट झोन सोडण्यास तयार झाला . 

तिथे तो मामाच्या शिकवणीमध्ये शिकू लागला आणि मामाने त्याला काही प्रेरणादायी व्यक्तींच्या जीवन कहाण्या एकविल्या आणि बबलू अभ्यासात आपले मन रमवू लागला . 

आणि पाहता पाहत बबलू दहावीत तालुक्यात पहिला आला !

आणि हे सगळं शक्य झालं ते बबलूच्या तीव्र इच्छाशक्तीमुळे आणि मामाच्या सपोर्टमुळे . 


 मित्रानो केवळ चुका करूनच शिकायला हवं असा काही नाही किंवा बबलूला जसे मामाने सांभाळले तसे आपल्यालाही कोणातरी आधार देईल अशी अपेक्षा ठेऊन वाट पाहणे ही बरोबर नाही . 

फक्त आयुष्यात कोणत्याही कठीण प्रसंगातून बाहेर येऊन आपण आपले नाव स्वकर्तृत्वावर मोठे करून शकतो हेच बबलूने आपल्याला दाखवून दिले . 

तुमच्या आजुबजुला ही असा कोणी एखादा बाबौ असेल तर त्याच्यापर्यंत ही कहाणी नक्की शेअर करा . 
कदाचित तुम्ही त्याच्या आयुष्यातील रमेश मामा बनु शकता . 


धन्यवाद !




आमच्या  माय प्रेरणा या संकेतस्थळाला जरूर भेट द्या इथे तुम्हाला विविध क्षेत्रातील उत्तुंग व्यकिमत्वांच्या तसेच त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा अनुभव घेता येईल










Post a Comment

0 Comments